KRUSHI_MITRA
येतो भरात जोंधळा बाप काढणी करतो
स्वतः राहून उपाशी पोट जगाचे भरतो.
" शेतामध्ये माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथे राबतो कष्टतो
माझा शेतकरी बाप "
कृषी _मित्र
भारत हा कृषिप्रधान देश असून भारताला वैभवशाली शेतीची परंपरा लाभलेली आहे. भारतात नानाविध प्रकारची अनेक पिकं घेतली जातात त्यात प्रामुख्याने भात गहू बाजरी पासून फळांच्या फुलांच्या नवनवीन प्रजातींपर्यंत. जसा काळ बदलला तशीच शेती करण्याची पद्धत ही बदलली. शेतीचे क्षेत्र स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता आर्थिक दृष्ट्या व्यवसायाचे उत्तम क्षेत्र बनला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांपुढचे शेती करण्याची आव्हाने ही बदलली
१). जमीन नापीक होणे.
२). जमिनीच्या आम्लतेचे प्रमाण बदलणे.
३). मातीची धूप होणे
वरील कारणांमुळे हवं तसं पीक येत नाही त्यामुळे, शेतमालाला हवा तसा बाजारभाव मिळत नाही. याचाच परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. म्हणून,
" Agriculture is the first step towards the civilization "
त्यामुळे जोपर्यंत शेतीला औद्योगिक दर्जा प्राप्त होत नाही तोपर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. Krushi_Mitra या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.