



मातीची चाचणी करण्याच्या सोप्या पद्धती :-
१) व्हिनेगर (शिरका) वापरून :-
ज्या मातीतील pH प्रमाण तपासायचे आहे, ती मुठभर माती एका काचेच्या भांड्यात घ्या.
मातीच्या दुप्पट प्रमाणात त्यामध्ये पाणी टाका. त्यामध्ये दोन मोठे चमचे विनेगर मिसळा. जर फेस तयार झाला तर ती माती basic आहे.
२) बेकिंग सोडा वापरून :-
एका काचेच्या भांड्यात मुठभर माती घ्या व त्यात मातीच्या दुप्पट प्रमाणात पाणी मिसळा. त्यात बेकिंग सोडा (खायचा सोडा ) तीन ते चार चमचे मिसळा. जर मिश्रणावर फेस आला तर माती acidic आहे.